15 जानेवारी 2026 रोजी होणा-या नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा याकरिता महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने निवडणूक विषयक ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. अशाच प्रकारचा *‘मतदान संकल्पपत्र’ हा एक अभिनव उपक्रम ‘आमचा संकल्प 100 टक्के मतदानाचा’ या शिर्षकांतर्गत नवी मुंबईतील शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.52 दिघा मध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात हा मतदानाचा संकल्पपत्र उपक्रम यशस्वी केला. यापुढील काळात महानगरपालिकेच्या तसेच खाजगी अशा सर्वच शाळांमध्ये संकल्पपत्राचा हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे.