अकोला: शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे, स्वाभिमानाने जगण्याची संधी द्या — शरद पवार
Akola, Akola | Nov 8, 2025 अकोला : शेतकऱ्यांना कर्जमाफीची भीक नको, तर स्वाभिमानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे, असे मत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. दिनांक ८ नोव्हेंबर रोजी अकोला दौऱ्यावर आले असता दुपारी 3 वाजता ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या समस्या केवळ कर्जमाफीने सुटणार नाहीत, तर त्यांना उत्पादन खर्चाला न्याय्य दर मिळणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही पवार यांनी या वेळी केली.