वर्धा: वर्ध्यात शिवसेना शिंदे गटाचा नगराध्यक्ष उमेदवार जाहीर; मनीषा कायंदे यांच्या उपस्थितीत रवीकांत बालपांडे यांचा अर्ज दाखल
Wardha, Wardha | Nov 16, 2025 वर्ध्यातील आगामी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने अखेर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत वर्धा नगरपरिषदेचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून रवीकांत बालपांडे यांचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले.कायंदे यांच्या उपस्थितीतच रवीकांत बालपांडे यांनी वर्धा नगराध्यक्ष पदाचा नामनिर्देशन अर्ज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास दाखल केला