कळमना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांनी सहा डिसेंबरला दुपारी चार वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार,एमडी ची तस्करी करणाऱ्या एका कुख्यात आरोपीला कळमना पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी नुकताच जेलमधून सुटला आणि एमडी तस्करीच्या गुन्ह्यात सक्रिय झाला. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांनी दिली आहे.