चोपडा: कोळन्हावी जवळील तापी नदीच्या पुलावरील तुटलेला कठळा आमदारांच्या सूचनेवरून केला दुरुस्त, नदी पुलावरील समस्या सुटली
Chopda, Jalgaon | Oct 21, 2025 कोळन्हावी या गावाजवळ तापी नदी आहे. या नदीवर पूल आहे. या पुलाचा कठडा हा एका अपघातामुळे तुटला होता. या ठिकाणी जाऊन चोपडा आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी पाहणी केली होती व कठडा दुरुस्तीच्या सूचना केल्या होत्या. तेव्हा सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल कार्यालयाच्या वतीने येथील काम पूर्ण करण्यात आले आहे व नदी पुलावरील समस्या सुटली आहे.