वर्धा शहरातील नागपूर–यवतमाळ बायपास रस्त्यालगत असलेल्या निवेदिता विलीयम आश्रमाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. सदर व्यक्ती 2 जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास आढळून आला असून या घटनेची नोंद सेवाग्राम पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 ते 50 वर्षे, उंची सुमारे 5 फूट 6 इंच, रंग सावळा असून अंगावर मेहंदी रंगाचे पूर्ण बाह्याचे जर्किन, लाल व पिवळ्या रंगाचे टी-शर्ट आणि निळ्या रंगाचा फुलपँट. डाव्या हातावर इंग्रजीत ‘MS’ असे टॅटू असून उजव्या हातात स