बोदवड शहरातून मलकापूर जाणारा रोड आहे. या रोडावर गोपाळ गंगतीरे यांची जय मातादी जिनिंग अँड प्रोसेसिंग फॅक्टरी आहे. या फॅक्टरीला अचानक आग लागली इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत ४५० क्विंटल कापूस जळून खाक झाला. यात ३५ लाखाचे नुकसान झाले आहे. तेव्हा या आगी प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात आगची नोंद करण्यात आली आहे.