उल्हासनगर: तडीपार असलेल्या आरोपीने माजी नगरसेवकावर केलेला हल्ल्याचा नवीन सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर
23 सप्टेंबर रोजी उल्हासनगर मधील माजी नगरसेवक तुलसी वसिटा यांच्यावर एका व्यक्तीने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अजय बागुल नावाचा व्यक्ती वसीटा कॉलनी येथे नशेचे पदार्थ विक्री करण्यासाठी आला होता.त्यानंतर त्याला कॉलनी मध्ये आल्यानंतर हटकले असता दोघांमध्ये वाद झाला आणि कोयता काढून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. असल्याचा नवीन सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.