नागपूर ग्रामीण: म्हाडा क्वार्टर येथे निर्माणाधीन बांधकामाच्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या व्यक्तीचा उपचार दरम्यान मृत्यू
पोलीस ठाणेवाडी हद्दीतील म्हाडा क्वार्टर येथे पन्नास वर्षीय व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळले होते त्यांना उपचाराकरिता मेयो रुग्णालयात नेले असता उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रवींद्र गेडाम यांनी दिलेल्या सूचनेवरून पोलीस स्टेशन वाडी येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.