अमरावती: विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांची सोयाबीन प्रादेशिक अनुसंधान केंद्रास भेट व पाहणी
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन संशोधन प्रकल्प-प्रादेशिक अनुसंधान केंद्रास विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी भेट देऊन पाहणी केली. संशोधनातून विकसित झालेल्या विविध सोयाबीन वाणांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व याबाबत सविस्तर माहिती घेतली.शेतकरी बांधवांनी या संशोधित वाणांचा अभ्यास करून त्यांचा शेतीत लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सिंघल यांनी केले. प्रत्यक्ष पाहणीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतासाठी योग्य वाण निवडणे सुलभ होते, असेही त