साकोली तालुक्यातील पाथरी येथील नामदेव बाळबद्धे यांच्या शेतात शनिवार दि.6 डिसेंबरला सकाळी आठ वाजता बिबट्याच्या दोन महिन्याचा बछडा आढळून आला गावकऱ्यांनी साकोली वनविभागाच्या स्वाधीन बछड्याला केले असून मादी बिबट्याकडे हा बछडा सोपवण्यासाठी रॅपिड रेस्क्यू युनिट भंडारा व रॅपिड रेस्क्यू युनिट साकोली ची 50 कर्मचाऱ्यांची चमू साकोली वन विभागाचे वनापरीक्षेत्राधिकारी श्री एस आर कटरे व उपवनसंरक्षक एस. टी.मेंढे यांच्या मार्गदर्शनात काम करत आहे.पाथरी गावाला छावणीचे स्वरूप आले