राज्य शासनाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेतील ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर करून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागून त्यातील ३ हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी काल बुधवारी अकोला जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात एसीबीने रंगेहाथ पकडलेल्या खासगी शिक्षक एजंट शैलेंद्र बगाटे प्रकरणाला न्यायालयात पूर्णविराम मिळाला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष प्रथम न्यायालयात आज दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद झाला. आरोपीकडून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.पी.डी.हातेकर यांनी काम पाहिले.