जालना: जिल्हा रुग्णालयात टाइल्स कोसळून दोन परिचारिका जखमी; निकृष्ट कामाचा आरोप; ठेकेदारावर कारवाईची मागणी
Jalna, Jalna | May 6, 2026 जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातील सोनोग्राफी कक्षात भिंतीवरील टाइल्स अचानक कोसळून दोन परिचारिका जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. बुधवार दि. 6 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तसेच संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा सामान्य रुग्णालयातील सोनोग्राफी रूममध्ये परिचारिका रेहाना शेख आणि साधना रावे या कर्तव्य बजावत असताना भिंतीच्या टाइल्स कोसळल्या.