जळगाव शहरात चोरट्यांनी आता दिवसाढवळ्या हातसफाई सुरू केल्याचे दिसत आहे. शहरामधील ओक मंगल कार्यालयाच्या पाठीमागील भागात कामासाठी आलेल्या एका प्रौढ व्यक्तीच्या खिशातून अज्ञात चोरट्याने सुमारे ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना शनिवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला