महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार तोफे थंडावल्यानंतर शहरात आचारसंहिता आणि 'ड्राय डे' लागू असतानाच, नरेंद्रनगर परिसरात एका बोलेरो गाडीत दारूच्या पेट्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मिळालेल्या माहितीनुसार, माधव नेत्रालयाजवळ महिंद्रा बोलेरो या वाहनाचा अपघात झाला. ही गाडी चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.