पलूस: बुरली गावाला १५ सप्टेंबर पर्यंत मिळणार पिण्याचे पाणी ;पलूस पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता कदम यांचे आश्वासन
Palus, Sangli | Aug 25, 2025 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पलूस तालुका युवक आघाडीच्या वतीने सोमवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी पलूस पंचायत समिती कार्यालय समोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. बुरली गावातील बौद्ध समाजातील नागरिकांना मागील सोळा वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येच्या सामना करावा लागत आहे. गावातील नागरिकांनी यापूर्वी अनेकदा पंचायत समिती आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे मागण्या केल्या, परंतु प्रत्यक्षात कोणताही ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाशी लाट पसरली आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या रिपब्लिकन