अमरावती: औद्योगिक विकासासाठी पायाभूत सुविधा प्राधान्याने उभाराव्यात – विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल
औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठी वीज, पाणी, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, रुग्णालय व पोलीस चौकी यांसारख्या पायाभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध कराव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय उद्योग समन्वय समितीची (DLCC) बैठक झाली. यावेळी उद्योग सहसंचालक निलेश निकम, एमआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राम लंके, उपरचनाकार स्नेहा नंद, महापालिका, पोलीस, वीज विभागाचे अधिकारी तसेच इंडस्ट्रीयल असोसि