महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प रब्बी हंगाम साठी (ई-पीक पाहणी डी सी एस) उपक्रमाची सुरुवात १० डिसेंबर २०२५ पासून करण्यात आलेली आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या ७/१२ उताऱ्यावर पीक पेरा स्वतः अँड्रॉइड मोबाईलद्वारे नोंदणी कराची आहे. शेतकरी स्तरावर पीक पाहणीसाठी २४ जानेवारी ही अंतिम मुदत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.