दिग्रस नगर परिषद निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडले. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार असून, त्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन दिग्रस तहसील कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये सील करून सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने स्ट्राँगरूम परिसरात बंदूकधारी एसआरपीएफ, जिल्हा मुख्यालयातील पोलिस, महसूल कर्मचारी, नगर परिषद कर्मचारी तसेच स्थानिक बंदूकधारी पोलिसांचा २४ तास कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्ट्राँगरूम परिसरात सीसीटीव्ही वाढविण्यात आले.