सातारा: सिकंदर शेख यांच्यावर खोटे आरोप –कराड येथील पत्रकार परिषदेत हिंद केसरी संतोष वेताळ यांची माहिती
Satara, Satara | Nov 2, 2025 हिंद केसरी कुस्तीगीर संतोष वेताळ यांनी सांगितले की प्रसिद्ध कुस्तीगीर सिकंदर शेख यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे व निराधार आहेत. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.वेताळ म्हणाले की, पंजाब पोलिसांनी शेख यांना अटक केल्यानंतर महाराष्ट्र कुस्ती संघटना या प्रकरणात सक्रिय झाली असून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेणार आहे.सिकंदर शेख यांच्यावर अन्याय झाला असून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे.