लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.उपस्थित नागरिकांनी आपल्या मोबाईल फोनवरील टॉर्चच्या प्रकाशाच्या सहाय्याने एकत्र येत ‘VOTE’ असा शब्द साकारत मतदानाचा संदेश दिला. अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या या प्रतिकात्मक उपक्रमातून “मतदानानेच लोकशाही उजळते” हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.