जळगाव: बिलवाडी खून प्रकरणानंतर संतप्त नातेवाईकांचा आकाशवाणी चौकात रास्ता रोको व ठिय्या आंदोलन
जळगाव तालुक्यातील बिलवाडी गावात रविवारी १४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत एकनाथ निंबा गोपाळ (वय-५५) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि फरार आरोपीला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी मयत एकनाथ गोपाळ यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. पोलीसांनी दिलेल्या आश्वासनानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.