डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त विद्यापीठामार्फत ॲग्रोटेक-2025 ही भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी व चर्चासत्र दि. 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनीचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.