पाटण: कोयनानगरला सोमवारी रात्री सव्वा बारा वाजता भूकंपचा सौम्य धक्का बसला; कोणतीही हानी झाली नाही
Patan, Satara | Sep 30, 2025 कोयना धरण परिसरात सोमवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावापासून नैऋत्यास तीन किलोमीटर अंतरावर होता. भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचला नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. या धक्क्यामुळं कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने सकाळी सहा वाजता दिली. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून लांब अंतरावर आहे.