ब्रह्मपूरी: उदापूर येथील 40 शेतकऱ्यांना मिळाला न्याय पोलीस बंदोबस्तीत शेतात जाण्याचा रस्ता मोकळा करण्यात आला
ब्रह्मपुरी तालुक्यातील उदापूर या गावातील शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षापासून रस्त्याची समस्या भेडसावत होती पूर्वजापासून असलेल्या शेतीत जाण्यासाठी त्यांना रस्ता नसल्याने गेली चार वर्षे ते शेतकरी इतरांच्या शेतातून वाट काढत फेरा मारत स्वत मालकीच्या शेतात जायचे अखेर चार वर्षानंतर त्यांच्या पाठपुराव्यानंतर त्या चाळीस शेतकऱ्यांच्या समस्या व तोडगा निघाला असून पोलीस बंदोबस्ती त्यांच्या शेती शिवारात जाण्याचा रस्ता आज मोकळा करण्यात आला आहे