भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळ कार आणि मोटारसायकलचा अपघात झाला आहे. या अपघातात कारने धडक दिल्याने मोटारसायकल चालक जखमी झाला असून या प्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १८ डिसेंबर रोजी तालुका पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.