जळगाव: हरीविठ्ठल नगरात अनधिकृत बांधकामाने आदिवासी कुटुंब बेघर; २ लाखांची खंडणीची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
हरीविठ्ठल नगरात ३० ते ३५ वर्षांपासून राहत असलेल्या एका आदिवासी भिल्ल कुटुंबाला त्यांच्याच घरातून बेघर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विनोद पंढरीनाथ पाटील नावाच्या व्यक्तीने त्यांच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून ताबा मिळवला व जागा खाली करण्यासाठी २ लाख रुपयांची मागणी केली जात आहे, याबाबत पीडित वामन भाऊसिंग गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला बुधवारी ४ जुन रोजी दुपारी १ वाजता निवेदन दिले आहे. करवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.