विद्युत वाहिनीचे काम आटोपल्यानंतर अचानक मुख्य विद्युत वाहिनी तुटून तेथून जात असलेला उमर शेख सलीम (वय २५, रा. दत्तनगर, मेहरुण) हा तरुण भाजून गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवार ८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अशोक किराणाजवळील चौकात घडली. जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.