पालम: गंगाखेड ते केरवाडी पालम मार्गावरील गलाटी नदीस पुर ; गंगाखेड पालम रस्ता वाहतुकीसाठी बंद
Palam, Parbhani | Sep 27, 2025 पालम तालुक्यातील गंगाखेड ते केरवाडी पालम या मार्गावरील गलाटी नदीस मोठा पूर आल्याने पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने आज शनिवार 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9 40 वाजेच्या सुमारास पालम गंगाखेड रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याचे दिसून आले. नदीवरील पुलावरून पाणी वाहत असताना कोणी पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.