लोहा: एसबीआय बॅंकेकडून दिव्यांग मुलीच्या बिज भांडवल प्रस्तावाबाबत विचारणा करणा-या पालक व पत्रकाराला दिले हाकलून, तक्रार दाखल
Loha, Nanded | Sep 15, 2025 एसबीआय लोहा बॅंकेकडून दिव्यांग मुलीच्या बिज भांडवल प्रस्तावा संदर्भात विचारणा करणा-या पालक व पत्रकाराला दिले हाकलून, सदरील हि घटना आज रोजी सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान घडली आहे. यासंदर्भात लोहा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती आज सोमवार दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान तक्रारदार उत्तम तिगोटे यांनी लोहा शहरातील एसबीआय बॅंक शाखेसमोर दिली आहे तसेच पत्रकार बालाजी शिंदे यांनी संबंधितांची चौकशी करून निलंबनाची मागणी आज केली आहे.