चांदूर रेल्वे: जुना बस स्टँड चौक येथे शेतकऱ्यांनी बेसन, भाकर, ठेचा खाऊन केली काळी दिवाळी साजरी
चांदुर रेल्वे ,धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बहुतांश भाग हा अद्यापही शेत पिकांच्या नुकसान भरपाई पासून वंचित आहे. सोयाबीन सारख्या पिकाचे उत्पादन घडल्यानंतरही भावामध्ये मात्र कुठलाही वाढ झालेली दिसत नाही. दिवाळी तोंडावर असताना शासनातर्फे बहुतांश शेतकरी लाभापासून वंचितच राहतील असं चित्र आहे. शासनाच्या या शेतकरी विरोधी धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी चांदुर रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यां तर्फे बेसन, भाकर ,ठेचा खाऊन काळी दिवाळी साजरी करण्यात आली.