सातारा: निवडणूक आयोगाच्या दोषपूर्ण नियोजनामुळे फलटण व महाबळेश्वरच्या नगरपालिका निवडणुका पुढे गेल्या; आ. शशिकांत शिंदे यांची टीका
Satara, Satara | Nov 30, 2025 सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्यास निवडणूक आयोगाचे अयोग्य आणि अकार्यक्षम धोरणच कारणीभूत ठरले असून त्यांच्या निवडणूक कार्यक्रमातच गंभीर त्रुटी होत्या, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. अपील दाखल करण्यासाठी अत्यंत मर्यादित वेळ दिल्याने अनेकांना सुनावणीची संधीच मिळाली नाही व अखेर निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ आयोगावर आली, असा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला.