जालना: पाणीवेस परिसरात वाहतूक कोंडीचा कहर : शहर वाहतूक शाखा पोलिसांवर नागरिकांचा संताप
Jalna, Jalna | May 6, 2026 जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर असलेल्या पाणीवेस परिसरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या या मार्गावर सतत वाहतूक जाम होत असतानाही शहर वाहतूक शाखेचे पोलीस मात्र पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पाणीवेस परिसरात अनेक वेळा दोन-दोन तास वाहतूक ठप्प राहत असून वाहनांच्या लांबच लांब रा