जालना: चंदनझीरा येथील ममतानगर परिसरात मोठ्या आवाजात डीजे; पोलिसांची कारवाई, चालक फरार
Jalna, Jalna | Apr 18, 2026 जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीतील ममतानगर परिसरात रात्री उशिरा मोठ्या आवाजात डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून संबंधित वाहन चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याची घटना समोर आली आहे.शनिवार दि.18 एप्रिल 2026 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी पोलीस कर्मचारी मारियो बनाट स्कॉट यांनी फिर्याद दिली आहे. दि.17 एप्रिल 2026 रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास चंदनझिरा परिसरात पोलीस पथक नाईट पेट्रोलिंग करत असतांना महानगरात डीजे सुरू होता.