पनवेल: भाजप महायुतीकडून उरण नगरपरिषद निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारांचे नामांकन दाखल होणार
Panvel, Raigad | Nov 12, 2025 भारतीय जनता पार्टी महायुतीतर्फे उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीकरिता नगराध्यक्ष पदाचे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार गुरुवार १३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता आपले नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करणार आहेत. या नामांकन दाखल सोहळ्यास रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड व्होकेट आशिष शेलार, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तसेच उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अविनाशजी कोळी यांच्यासह महायुतीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.