पारोळा: सर्व्हिस रोडसाठी म्हसवे फाट्यावर 'रास्ता रोको'; दुतर्फा वाहतूक ठप्प
पारोळा---- तालुक्यातील म्हसवे फाटा ते पारोळा या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावर सर्व्हिस रोड तयार करण्याच्या प्रलंबित मागणीसाठी परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी आज तीव्र आंदोलन केले. आपल्या मागणीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे लक्ष वेधण्यासाठी म्हसवे फाटा येथे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत महामार्गावर ठिय्या मांडला.