खांबी/पिंपळगाव येथे आयोजित केंद्रस्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थित राहून विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले. यावेळी सर्व विजेत्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी शुभेच्छा देऊन ज्यांना यश प्राप्त नाही झाले त्यांना परत एकदा जोमाने तयारी ला लागण्याचे आवाहन केले. यावेळी खांबी पिंपळगाव केंद्र अंतर्गत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.