समुद्रपूर: लहुजी साळवे जयंती निमित्त मोहगांव येथे नेत्र तपासणी शिबीर: नागरीकांचा मोठ्या संख्येने शिबीराला प्रतिसाद
समुद्रपूर तालुक्यातील मोहगांव ग्रामपंचायत कार्यालयात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत लहु शक्ती सेनेच्या वतीने लहुजी साळवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून नागरीकांना उदभवणाऱ्या डोळ्याच्या समस्यांपासून दिलासा देण्यासाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सरपंच विलास नवघरे याच्या हस्ते लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पुजन करून शिबीराची सुरुवात करण्यात आली.यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा सरचिटणीस गणेश मुंगले,ग्रामसेवक अखिल ढोबळे, प्रामुख्याने उपस्थित होते.