कामठी: कामठी नगर परिषद कार्यालयासमोर आढळलेल्या अनोळखी मृतदेहाचा हितजोती आधार फाउंडेशन कडून दफनविधी
Kamptee, Nagpur | Oct 14, 2025 १० ऑक्टोबर सकाळी ७ वाजता सुमारास स्थानिक नागरिकांना नगर परिषद कार्यालयासमोर नाल्याच्या कडेला एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसले.मृतदेह कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहेत.