इनोवेशन वर आधारित स्टार्टअप ची भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी अत्यंत गरज असून त्यावर नव उद्योजकांनी भर द्यावा असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खारघर मध्ये इनोव्हेशन गॅलरीच्या उद्घटनावेळी केले.रयत शिक्षण संस्थेच्या खारघर येथील रयत सेन्टेनरी इनोवेशन अँड इंक्युबेशन फाउंडेशन येथील इनोव्हेशन गॅलरीचे उद्घाटन रयतेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आज मंगळवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास झाले. यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.