वसई विरार महानगरपालिका आणि युथ फॉर जॉब्स मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वसई विरार महानगरपालिका मुख्यालय येथे दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात बाराहून अधिक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या, अडीचशे हुन अधिक दिव्यांग उमेदवारांनी मेळाव्यास हजेरी लावली. ८२ अधिक दिव्यांग व्यक्तींचे विविध कंपन्यांमध्ये या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून निवड करण्यात आली.