सेनगाव: तालुक्यात मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी ओढ्याला पूर,जनजीवन विस्कळीत
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव तालुक्यात आजेगांव सह विविध परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच सेनगांव तालुक्यातील विविध परीसरातील नदी,नाले व ओढ्यांना पूर आला आहे. तसेच सेनगांव तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे अगोदरच खरीप हंगामातील सोयाबीन सह पिके धोक्यात सापडली असून त्यातच आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळपासूनच हजेरी लावल्याने आजेगांव जवळील ओढ्याला पूर आला तसेच विविध ठिकाणचे देखील नदी,नाले व ओढे प्रवाहित झाले आहेत.