अकोट: शुक्रवारी श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे वारकरी शिक्षण संस्थेचा शुभारंभ; कामगार मंत्री फुंडकरांची असणार उपस्थिती
Akot, Akola | May 28, 2025 श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र आळंदी देवाची यांची मान्यता प्राप्त उपशाखा महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम श्री संत वासुदेव महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे दि.३० मे रोजी सुरू होत आहे. या वारकरी शिक्षण संस्थेच्या उद्घाटन सोहळ्यास श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथील अध्यक्ष श्री.ह.भ.प.संदिपान महाराज शिंदे उद्घाटक म्हणून राहणार व कार्यक्रमाच्या विशेष उपस्थितीमध्ये महाराष्ट्राची कॅबिनेट कामगार मंत्री आकाश फुंडकर उपस्थित राहणार आहेत.