जालना: जालना जिल्ह्यात पेट्रोल पंप जाळण्याची धमकी; दोघा भावांना परतूर पोलिसांनी घेतले ताब्यात
Jalna, Jalna | May 26, 2026 जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथील इंडियन पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यावरून झालेल्या वादातून गोंधळ घालत कर्मचार्याला मारहाण करून पेट्रोल पंप पेटवून देण्याची धमकी देणार्या दोघा भावांना परतूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवार दि. 26 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.25 मे रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या दरम्यान करण सुरेश सदावर्ते आणि मिलिंद सुरेश सदावर्ते यांनी ही धमकी दिली होती.