अकोट: तालुक्यातील देऊळगाव नजिक नदीत महिलेचा मृतदेह आढळला;मृतक महीला चंडीकापुर येथिल असल्याची माहीती
Akot, Akola | Sep 16, 2025 तालुक्यातील देऊळगाव येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास एका अंदाजे ६० वर्षिय महिलेचा मृतदेह नदीत आढळल्याची घटना उघडकीस आली याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ देऊळगाव जवळील या घटनास्थळी नदी पात्रात असणाऱ्या महिलेचा मृतदेह नदीपात्रा बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला दरम्यान या घटनेतील मृतक महिला ही चंडीकापूर येथील असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत असून वृत्तांकनापर्यंत ग्रामीण पोलिसांची याप्रकरणी कायदेशीर प्रक्रीया सुरू होती.