धामणगाव रेल्वे: निंभोरा बोडखा येथे मोठ्या भावानेच केली लहान भावाला मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल
सोपान रामचंद्र बढिये वय वर्ष 40 राहणार निंबोरा बोडखा यांनी ज्ञानेश्वर रामचंद्र बढीये याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. सोपानं ज्ञानेश्वर हे दोघे भाऊ असून शेतीच्या कारणामुळे ज्ञानेश्वर ने सोपान याला लोखंडी पाईपने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार सोपान यांनी पोलिसात दिली आहे .तेव्हा पोलिसांनी ज्ञानेश्वर विरोधात विविध कलमाने गुन्ह्याची नोंद केली आहे.