जालना: संजय नगरमध्ये अवैध पार्किंग, अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त; कारवाई करण्याची महानगरपालिका प्रशासनाकडे मागणी
Jalna, Jalna | May 22, 2026 जुना जालना परिसरातील संजय नगर, वॉर्ड क्रमांक 11 आणि 13 मधील नागरिकांनी वाढत्या वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग, रस्त्यांवरील अतिक्रमण आणि सांडपाण्याच्या समस्यांविरोधात स्थानिक नागरीकांनी महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाईची मागणी केली आहे. शुक्रवार दि. 22 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक नागरीकांनी परिसरातील गंभीर नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय नगरमधील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण झाले.