गडचिरोली: गडचिरोली पोलीस दलाचा नागरिकांना महत्त्वाचा इशारा: ‘फ्रॉड ॲप्स’पासून सावध राहा
कमी व्याजदरात आणि त्वरित कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली सध्या अनेक अनधिकृत ॲप्स व मोबाईल ॲप्लिकेशन्स सक्रिय आहेत. यामुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. गडचिरोली पोलिसांनी या धोकादायक ॲप्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. 'मोठे कर्ज, कमी व्याजदर, त्वरित पैसे मिळतील' अशा आकर्षक जाहिराती आणि आमिषे दाखवून हे ॲप्स नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढतात.