भाचीसाठी स्थळ आलेल्या मुलाचे घर पाहण्यासाठी जाणाऱ्या रिक्षाला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी रोजी दुपारी 1 वाजता सुमारास नशिराबाद रोडने वाघुर धरणाच्या बाजूला असलेल्या कच्च्या रस्त्यावरील वळणावर घडली. याप्रकरणी बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता कार चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.