बस स्थानकात 60000 रुपयाचा खिसा कापणारा चोरटा 48 तासात पोलिसांनी पकडला
Beed, Beed | Oct 30, 2025 बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील एका शेतकऱ्याचा साठ हजार रुपयांचा खिसा कापण्याची घटना बीड बसस्थानकात घडली होती. ही रक्कम तो आपल्या मुलीच्या शैक्षणिक फी भरण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जात होता. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने शेतकऱ्याच्या खिशातील पैसे चोरले. या प्रकरणी शेतकऱ्याने तात्काळ शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सीसीटीव्ही फूटेजचा आधार घेत पोलिसांनी संशयिताचा शोध घेत अखेर चोरटा पकडला.